कोलकाता : कोलकातामधील महिला डॉक्टरच्या अत्याचार प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात आता एक नवं नवा समोर आलं आहे. आरजी कर मेडिल कॉलेजचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. ही घटना घडली तेव्हा त्या ठिकणी डॉक्टर देबाशीष सोम उपस्थित होता.
कोण आहे देबाशीष सोम?
आरजी कर मेडिल कॉलेजचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी केलेल्या दाव्यानुसार रुग्णालयात 31 वर्षांच्या महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर क्राईम सीनवर डॉक्टर देबाशीष सोमही उपस्थित होता. इतकंच नाही तर पोस्टमॉर्टेमच्या वेळी देखील देबाशीष सोम हजर होता. डॉक्टर देबाशीष सोम हे पश्चिम बंगालच्या आरोग्य भरती बोर्डाचे सदस्य आहेत. आरजी कर मेडिकल कॉलेजशी त्यांचा काहीही संबंध नाही.
देबाशीष सोम आधी आरजी कर मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या काळात औषध खरेदी-विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. रुग्णालयाच्या कॅफेटेरियाचा मालक चंदन लौह आणि माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांचाही या भ्रष्टाचारामध्ये हात होता असे अख्तर अली यांनी सांगितले आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
8-9 ऑगस्टच्या रात्री कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या सेमीनार हॉलमध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. महिला डॉक्टरचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सेमीनार हॉलमध्ये आढळून आला. घटनेच्या आधी महिला डॉक्टर 36 तासांची शिफ्ट संपवून आराम करण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये गेली होती. तिथेच रात्री तीन ते चारच्या दरम्यान ही घटना घडली. महिला डॉक्टरच्या शरीरावर अनेक जखमा होत्या.
याप्रकरणी संजय रॉय नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि महिला डॉक्टरच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या ब्ल्यू टुथ डिव्हाईसच्या आधारे संजय रॉयला अटक करण्यात आली आहे.