‘एखाद्याचा जीव गेला आणि तुम्ही हसताय’, सॉलिसिटर जनरल यांनी कपिल सिब्बल यांना फटकारले

नवी दिल्ली ( Kolkata doctor murder case ) – कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान ममता सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले. न्यायमूर्ती पार्डीवाला म्हणाले की, त्यांच्या 30 वर्षांच्या अनुभवात त्यांनी असा निष्काळजीपणा पाहिला नाही.
दरम्यान, सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यात जोरदार वादावादी झाली.
वास्तविक, सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी सुरू होती. दरम्यान, ममता सरकारच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या युक्तिवादावर हसले. यावर सॉलिसिटर जनरल म्हणाले की, कोणीतरी आपला जीव गमावला आणि तुम्ही हसत आहात. निदान हसू नका.
“At least dont Laugh!!!”
Solicitor General Tushar Mehta to Senior Advocate Kapil Sibal in #RGKarMedicalCollegeandHospital suo motu hearing#SupremeCourt Court pic.twitter.com/mOY5SOsP2H— LawBeat (@LawBeatInd) August 22, 2024
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान तुषार मेहता केस डायरीचा हवाला देत पोलिसांना या प्रकरणाची माहिती केव्हा देण्यात आली ते सांगत होते. यावर कपिल सिब्बल हसायला लागले. यावर सॉलिसिटर जनरल संतापले आणि म्हणाले की, जर एखाद्याचा जीव गेला असेल तर किमान हसू नका.
डॉक्टरांना कामावर परतण्यास सांगितले –
सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान डॉक्टरांच्या संघटनांना आश्वासन दिले की राष्ट्रीय टास्क फोर्स सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेईल. यासोबतच आंदोलक डॉक्टरांना आधी कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.



