Doctor Murder Case: महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येची सीबीआय चौकशी होणार, कोलकाता उच्च न्यायालयाचे आदेश

कोलकाता – आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपवतील –
महिला डॉक्टरच्या हत्येशी संबंधित सर्व कागदपत्रे बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. याआधी सोमवारी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जाईल, असे सांगितले होते.
रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला –
आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमधून शुक्रवारी सकाळी एका ज्युनियर महिला डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह सापडला होता. मृतदेह सापडल्याने संपूर्ण रुग्णालय परिसरात खळबळ उडाली. मृतका ही पदव्युत्तर द्वितीय वर्षाची विद्यार्थी असून ती रुग्णालयातील चेस्ट मेडिसिन विभागात कार्यरत होती. तीचे घर उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील सोडेपूर भागात आहे.
या प्रकरणात वकील बिल्वदल म्हणाले की, सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी करा, असे सीएम ममता यांनी सांगितले होते. त्यासाठी काही कालावधीनंतरच तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवता येईल, अशी वेळ त्यांनी निश्चित केली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात विलंब घातक ठरू शकतो, असे त्या म्हणाल्या होत्या. खटल्याशी संबंधित अनेक पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, असा युक्तिवाद त्यांनी केला.





