वरातीत नाचताना धक्का लागल्याचा मनात धरला राग; कोल्हापूरात तरुणाला बेदम मारहाण
Updated On:

कोल्हापूर – लग्नात वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग मनात धरुन एका तरुणाला टोळक्याने मिळून भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरीतील पन्हाळा मार्गावर हा प्रकार घडला असून मारहाणीचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/789204201744356
विवेक चौगले असे मारहाण केलेल्या तरुणाचे नाव असून टोळक्यांनी मारहाणीत विवेक यांची सोन्याची चैनसह रोख रक्कमही लंपास केली आहे. विवेक हे केबल व्यावसायिक आहे.
मारहाणीचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ 4 ऑगस्टची असल्याची माहिती समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या या टोळक्यावर आता कारवाईची मागणी करण्यात येत आहे.





