कोल्हापूर : आज दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेईल. राज्यभरात आज दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. दरम्यान, कोल्हापुरातही थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
तुकाराम माळी तालीम मंडळाचा बाप्पा हा कोल्हापूरचा प्रथम मानाचा गणपती आहे… या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली की शहरातील विसर्जन मिरवणूक सुरू होते. खासबाग मैदानापासून या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे.
शाहू महाराज यांच्या हस्ते आरती होऊन थोड्याच वेळात कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे…पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात ही विसर्जन मिरवणूक सुरू होईल.