कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुक : काँग्रेसला बहुजन महापार्टीचा पाठिंबा
Updated On:

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत असून या मतदारसंघातून काँग्रेसच्या जयश्री जाधव उमेदवार आहेत. या मतदारसंघातून उमेदवार उभा न करता काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय बहुजन महापार्टीने घेतला आहे.
भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष असून देशात महागाई, अन्याय अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भाजपासारख्या जातीयवादी पक्षाला रोखणे गरजेचे असून त्याचसाठी काँग्रेस उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत बहुजन महापार्टी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे पत्र या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव शमशुद्दीन खान यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. बहुजन महापार्टीचे कार्यकर्ते काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करून त्यांना विजयी करण्यासाठी मेहनत करतील असे बहूजन महापार्टीने म्हटले आहे.





