कोल्हापूर : गोकुळ मतमोजणीनंतर जिल्ह्यात रॅली आणि मिरवणुकीवर बंदी

Updated On:

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी उद्या 4 मे रोजी कसबा बावड्यातील रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल इतर पार पडत आहे. या निकालानंतर कोल्हापूर जिल्ह्यात रॅली आणि मिरवणुकीवरती बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.

उद्या 4 मे रोजी गोकुळ निवडणुकीसंदर्भात रमणमळा इथं मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी बाहेरील तालुक्यातील मतमोजणी ठिकाणी गर्दी करण्यास पोलिसांनी मज्जाव केलेला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असून कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केल आहे. तसंच निवडणूक केंद्रांवरती आय कार्ड पाहून सोडल जाणार असून फक्त उमेदवार आणि त्याचे मतदान प्रतिनिधींना आयकार्ड पाहून प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

निवडणूक निकालानंतर कोल्हापूर जिल्ह्यात रॅली अथवा मिरवणुकीवर बंदी घालण्यात आल्याचे आदेश पारित केल्याचे बलकवडे यांनी म्हटलं आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

आणखी संबंधित बातम्या

कलाकारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची मागणी...

2021-07-21 18:07:30

कलाकारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची मागणी...

कोल्हापुरात मुसळधार; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

2021-06-17 19:17:08

कोल्हापुरात मुसळधार; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

'...तर आजपासून कामबंद'; वीज कर्मचाऱ्यांचा महावितरण प्रशासनास इशारा

2021-05-24 12:06:39

'...तर आजपासून कामबंद'; वीज कर्मचाऱ्यांचा महावितरण प्रशासनास इशारा

विलगीकरण कक्षातील राजकारण थांबवा

2021-05-24 11:03:26

विलगीकरण कक्षातील राजकारण थांबवा

वीजकंपनी कामगारांचा आजपासून संप

2021-05-24 09:20:30

वीजकंपनी कामगारांचा आजपासून संप