ICC rankings : कोहली, रोहित व बुमराहचे स्थान कायम
Updated On:

दुबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व हिटमॅन रोहित शर्मा यांनी फलंदाजांच्या क्रमवारीतील तसेच जसप्रीत बुमराहने गोलंदाजांच्या क्रमवारीतील आपले स्थान कायम राखले आहे. आयसीसीने गुरुवारी एकदिवसीय सामन्यांची क्रमवारी जाहीर केली आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली 871 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम राहिला आहे. अर्थात त्याला रोहित (855) तर पाकचा बाबर आझम (829) यांचे आव्हान राहणार आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 719 गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने पहिले स्थान पटकावले आहे.





