Saving Schemes: पोस्ट ऑफिसची खास योजना, दरमहिना 5 हजार गुंतवून मिळवा 8 लाख रुपये; पाहा डिटेल्स

Post Office Small Saving Schemes Details: तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर कधीही सरकारी योजनांना प्राधान्य द्यायला हवी. सरकार बचत योजनांमध्ये परतावा कमी मिळत असला तरीही नुकसान होण्याची भिती कमी असते. अशीच एक सुरक्षित योजना म्हणजे पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग. या योजनेमध्ये तुम्ही दरमहिन्याला 5 हजार रुपये गुंतवून लाखो रुपये जमवू शकता. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग योजनेंतर्गत (Post Office Small Saving Schemes) किती गुंतवणूक करायला हवी व किती परतावा मिळू शकतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
गुंतवणुकीवर मिळेल 6.7 टक्के व्याज
सरकारने 2023 मध्ये पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेवरील व्याजदरात वाढ केली होती. या योजनेंतर्गत गुंतवणुकीवर 6.7 टक्के व्याज मिळते. हे व्याज वार्षिक आधारावर दिली जाते. तुम्ही या योजनेतून दरमहिन्याला 5 हजार रुपये गुंतवून 8 लाख रुपये जमा करू शकता.
या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्ष आहे. अशाप्रकारे, दरमहिन्याला 5 हजार रुपये गुंतवल्यास एकूण 3 लाख रुपये जमा होतील. यावर 6.7 टक्के दराने 56,830 रुपये जमा होतील. अशाप्रकारे 5 वर्षात 3,56,830 रुपये तुम्हाला मिळतील.
या रक्कमेला 5 वर्षांच्या अतिरिक्त मुदतीवर गुंतवू शकता. अशाप्रकारे 10 वर्षात एकूण 6 लाख रुपये मुद्दल व त्यावर 6.7 टक्के दराने 2,54,272 रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे, 10 वर्षात एकूण 8,54,272 रुपये जमा होतील.
कर्जाचाही पर्याय उपलब्ध
पोस्ट ऑफिसच्या या योजनेवर कर्जाचा देखील पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्याही जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता. अगदी 100 रुपयांपासून गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. या योजनेतील आवृत्ती ठेवीचा कालावधी 5 वर्ष आहे. यावर तुम्हाला कर्जाची देखील सुविधा मिळते. 1 वर्षाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला जमा रक्कमेच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. मात्र, कर्जावर 2 टक्के व्याज द्यावे लागेल.




