रतन टाटा यांच्याबद्दल १० महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या…

Ratan Tata Passes Away | रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. 9 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केल आहे. रतन टाटा यांच्याबद्दल १० महत्वाच्या गोष्टी …
Ratan Tata Passes Away | रतन टाटा यांच्याबद्दल १० महत्वाच्या गोष्टी:
1. जन्म: १९३७ साली मुंबईत झाला.
2. शिक्षण: हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले.
3. टाटा समूह: १९९१ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष झाले.
4. अधिग्रहण: टेटली टी, जग्वार लँड रोव्हर आणि कोरस कंपन्यांचे अधिग्रहण केले.
5. सन्मान: २००० मध्ये पद्म भूषण आणि २००८ मध्ये पद्म विभूषण पुरस्कार मिळवला.
6. दान: उत्पन्नाचा ६०-६५% भाग परोपकारी कार्यांसाठी दान केला.
7. स्वस्त कार: त्यांनी जगातील सर्वात स्वस्त कार, नॅनो, बाजारात आणली.
8. वैचारिक नेतृत्व: भारतात उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान आणले.
9. समाजसेवा: शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासात मोठे योगदान दिले.
10. निवृत्ती: २०१२ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले.
रतन टाटा यांच्या योगदानामुळे ते एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कायम स्मरणात राहतील.





