IPL 2024 : केएल राहुलला आयपीएल खेळण्याची NCA कडून परवानगी…! पण ठेवली ‘एक’ अट, “संपूर्ण हंगाम खेळायचा असेल तर..”.

KL Rahul Fitness, IPL 2024 & National Cricket Academy : आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी आहेत. पण दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, केएल राहुलला तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. पण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने ( National Cricket Academy ) सांगितले की, केएल राहुलने आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू नये. मात्र, यानंतर तो संपूर्ण स्पर्धेत खेळण्यास तंदुरुस्त आहे.
लखनऊ सुपर जायंट्ससाठी खुशखबर!
अलीकडेच भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. केएल राहुल दुखापतीमुळे या कसोटी मालिकेत खेळला नाही, परंतु आता लखनऊ सुपर जायंट्सच्या चाहत्यांसह भारतीय चाहत्यांसाठी एक चांगली बातमी येत आहे. मात्र, लखनऊ सुपर जायंट्ससाठी केएल राहुल कधी मैदानात उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीने म्हटले आहे की, केएल राहुल तंदुरुस्त आहे, पण त्याने आयपीएलच्या सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू नये.
केएल राहुलची ( KL Rahul ) आयपीएल कारकीर्द….
केएल राहुलच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 118 सामने खेळले आहेत. सध्या, तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे, परंतु याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचा भाग होता.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/wpl-2024-rcb-prize-money-money-rained-on-champion-royal-challengers-bangalore/
आयपीएल सामन्यांमध्ये केएल राहुलने 134.42 च्या स्ट्राइक रेटने आणि 46.78 च्या उत्कृष्ट सरासरीने 4 हजार 163 धावा केल्या आहेत. केएल राहुलने आयपीएल सामन्यांमध्ये 4 शतके झळकावली आहेत. याशिवाय पन्नास धावांचा आकडा 33 वेळा पार केला आहे. तर केएल राहुलची सर्वोच्च धावसंख्या 132 आहे. केएल राहुलने 50 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त 75 एकदिवसीय आणि 72 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.





