IPL 2021 : मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकात्याचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
Updated On:

चेन्नई – इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबई संघात अपेक्षेप्रमाणे ख्रिस लीनच्या जागी क्विंटन डी कॉकचा समावेश करण्यात आला आहे.
आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगळुरूविरुद्ध पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सला आझ तुल्यबळ कोलकाता नाईट रायडर्सशी लढत द्यावी लागणार आहे. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी कोलकाता सज्ज आहे, तर पहिल्या सामन्यातील पराभव विसरून सरस खेळ करण्याचे आव्हान मुंबईसमोर आहे.





