पुणे जिल्हा | किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी अरुण डोळे

मलठण, (वार्ताहर)- रावणगाव (ता. दौंड) येथील अरुण जगन्नाथ आटोळे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी व हिंगणीबेर्डी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य देविदास तुकाराम ढवळे यांची उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. आमदार राहुल कुल व भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांच्या हस्ते आटोळे यांना निवडीचे पात्र देण्यात आले.
यावेळी दौंड तालुका मार्केट कमिटीचे सभापती गणेश जगदाळे, भीमा सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, गोरख दिवेकर, साहेबराव वाबळे, उमेश देवकर, माजी संचालक लक्ष्मण रांधवण, मानसिंग गाढवे, दादा धायतोंडे, हौशीराम आटोळे, विकास आटोळे, संग्राम भोपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
अरुण आटोळे हे पुणे जिल्हा सहकारी शेळी, मेंढी उत्पादक संस्थेवर सदस्य व कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत तालुका शेतकरी सल्लागार समितीवर कार्यरत आहेत. आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे व त्यांच्या समस्या सोडविणार असल्याचे आटोळे आणि ढवळे यांनी सांगितले.





