पोलिसांनी ताब्यात घेताच किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

कऱ्हाड – प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे. कऱ्हाडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर होते मात्र कोल्हापूरातील वातावरण तापल्याने त्यांना आज पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिसांनी कऱ्हाडमध्ये ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर व सातारा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.

त्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे. अशी प्रतिक्रिया पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकामधील मंत्र्यावर अनेक भ्रष्टाचारचे आरोप केले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण आणखीच तापले आहे.

दरम्यान, नुकतेच त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप त्यांनी केले आहेत. त्यामुळे ते कोल्हापूरात काय बोलणार याची सर्वानांच उत्सुकता लागून राहीली आहे. मात्र त्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.