“खोटं बोलण्याचीही एक मर्यादा…” ; राहुल गांधींवर किरण रिजिजू का भडकले? वाचा

Kiren Rijiju Vs Rahul Gandhi । संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला घेरले होते. त्यांनी सरकारवर लढाऊ विमानांच्या वैमानिकांना त्यांच्या कर्तव्यापासून लांब राहायला म्हणजेच त्यांचे हात बांधल्याचा आरोप केला होता, ज्यासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आता राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी,”खोटे बोलण्याचीही एक मर्यादा असते. आता भारतातील जनता राहुल गांधींना सांगेल की आता बस्स झालं. ”
‘तुम्ही सतत खोटे का बोलत राहता?’ Kiren Rijiju Vs Rahul Gandhi ।
एका पोस्टमध्ये किरण रिजिजू यांनी, “मी राहुल गांधींना भारतीय संसदेची प्रतिष्ठा राखण्याची विनंती करतो. तुम्ही सतत खोटे का बोलत राहता? मी अनेक विरोधी नेत्यांना संसदीय शिष्टाचाराचे पालन करताना पाहिले आहे. तुम्ही केवळ तुमची प्रतिष्ठा कमी केली नाही तर भारताच्या उच्च प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचवला आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
झूठ बोलने की भी एक सीमा होती है! अब भारत के लोग ही श्री राहुल गांधी से कहेंगे कि अब बहुत हो गया। https://t.co/gJ8vPc16B3
— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 10, 2025
राहुल गांधी काय म्हणाले? Kiren Rijiju Vs Rahul Gandhi ।
पावसाळी अधिवेशनात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (२९ जुलै २०२५) पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाषण करताना म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने वैमानिकांचे हात बांधले होते, परंतु १९७१ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्कराला मोकळीक दिली होती.
ते म्हणाले, “भारत सरकारने चूक केली आहे. आमचे कोणाशी तरी भांडण आहे आणि आम्ही त्यांना सांगतो की भैया, आता ठीक आहे, आम्हाला लढाई नको आहे. आम्ही तुम्हाला एकदा थप्पड मारली आहे, आम्ही तुम्हाला पुन्हा थप्पड मारणार नाही. चूक सैन्याची नाही तर सरकारची होती.”
लष्करप्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरविषयी दिली माहिती
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरची पडद्यामागची गोष्ट सांगताना, “सरकारने आम्हाला पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी आमच्या नियोजनानुसार पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची मोकळीक दिली होती” असे म्हटले.त्यासोबतच आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी,”ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची किमान पाच लढाऊ विमाने पाडण्यात आली. याशिवाय, एक AWACS देखील पाडण्यात आले”असे म्हटले.





