नवी दिल्ली – अभिनेते अनुपम खेर यांची पत्नी आणि अभिनेत्री ‘किरण खेर’ यांना करोनाची लागण झाली आहे. स्वतः किरण खेर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. 20 मार्च रोजी किरण खेर यांनी ट्विटरवर आपल्या प्रकृतीबाबतची माहिती दिली. “मी कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेचच आपली कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी..!” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय.
I have tested positive for Covid. So anyone who has come in contact with me please get yourself tested.
— Kirron Kher (@KirronKherBJP) March 20, 2023
दरम्यान, ‘करोना’ या तीन अक्षरी शब्दांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घातला होता. जगात करोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली. तर करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान, अश्यातच आता करोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
किरण खेर यांच्या या पोस्टनंतर चाहते त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट करत किरण यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. याआधी 2021 मध्ये किरण खेर यांना रक्ताचा कर्करोग झाला होता. यावर पूर्ण उपचार घेत त्यांनी यशस्वीरित्या मात केली.