बारामती: छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीतून किरण गुजर यांची माघार; राजकीय चर्चांना आले उधान
Updated On:

बारामती: छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी किरण गुजर यांनी बारामती गटातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी माघार घेतला आहे. अजित पवार यांचे निकटवर्ती समजले जाणारे किरण गुजर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून निवडणुकीसाठी एकूण सहाशे अर्ज दाखल झाले होते. किरण गुजर यांनी बारामती गटातून पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी अर्ज माघारी घेतला आहे. किरण गुजर यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.





