पारगाव शिंगवे -पारगाव (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किरण किसनराव ढोबळे यांची बिनविरोध करण्यात आली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. भोजणे यांनी दिली.
सरपंच बबनराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती. उपसरपंच पदासाठी किरण ढोबळे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित उपसरपंच किरण ढोबळे यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी दूध संघाचे संचालक दौलत लोंखडे, सरपंच बबनराव ढोबळे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक माउली अस्वारे, माजी सरपंच राजू ढोबळे, माजी उपसरपंच सुनंदा ढोबळे, नानासाहेब ढोबळे, संदीप बढेकर, नामदेव पुंडे, मधुकर दातखिळे, सुनील ढोबळे, निवृत्ती ढोबळे, भागचंद पोंदे, सुनील चांगण, स्वप्निल पोंदे आदी मान्यवर उपस्थित होते.