मात्र, आता हळूहळू सर्व अनलॉक करताना दिसत आहेत. तसेच राज्य सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत. हे सर्व नियम लक्षात घेऊन आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननेही आपल्या कामाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान आपल्या मुंबई ‘मन्नत’ बंगल्याच्या बालकनीतून शुटिंग करताना दिसून आला. या छोट्या व्हिडीओ क्लिपमध्ये शाहरुख शुटिंग करताना दिसत आहे.
\n\n\nKing Khan spotted at his balcony!
\n
\nAny guesses what’s happening? 😉@iamsrk#ShahRukhKhan pic.twitter.com/WYdS5zkJql— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) June 26, 2020
\nव्हिडीओमध्ये शाहरुख खानने चेक्स फ्रिंट असलेलं शर्ट घातलं आहे. तो शुटिंग दरम्यान तो आपले हात उंचावून काहीतरी डायलॉग बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. शाहरुख आपल्या नव्या प्रोजेक्टसाठी शुटिंग करत आहे. अद्याप तो नक्की कोणत्या प्रोजेक्टसाठी शुटिंग करत आहे, ते समजलं नाही. शाहरुख खानचे फॅन्स पुन्हा एकदा त्याला स्क्रिनवर पाहण्यासाठी एक्सायटेड आहेत. लोक त्याच्या पुढच्या चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.