औंध – बालेवाडी येथील महिला एव्हरेस्ट वीर सुविधा कडलग यांनी अथक परिश्रमाने अतिउच्च माउंटएव्हरेस शिखर सर केले आहे. तब्बल 8,849 हजार फूट उंचीचे शिखर सर करीत दोन मुलांची आई असलेल्या कडलग यांनी युवतींसह गृहिणींसमोरही आदर्श प्रस्थापित केला आहे. माउंटएव्हरेस्ट शिखराचे गिर्यारोहकांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. आव्हानात्मक मानले जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. पुणे ते दिल्ली मार्गे काठमांडू ते रामशाप असा प्रवास करीत दि. 8 एप्रिलला या मोहिमस सुरुवात “द अल्पायनिस्ट’ संस्थेचे गिर्यारोहक भगवान चवले यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेस सुरूवात झाली. यामध्ये सुविधा कडलग, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे यांनी सहभाग घेतला होता. या गिर्यारोहकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. एवरेस्टवीर सुविधा कडलग यांच्या माउंट एव्हरेस्ट या यशस्वी महत्त्वाकांक्षी मोहिमेने शरीर आणि मन यांना अपार टणक बनवले. महिलाही अशा धाडसी मोहिमेत यशस्वी होऊ शकतात, हे कडलग यांनी दाखवून दिले. देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सुविधा कडगल यांनी एव्हरेस्टवर मराठी झेंडा फडकवला. सुविधा कडलग यांचे या कामगिरीसाठी कौतुक होत आहे. उणे 20 अंश सेल्सिअस तापमान प्रचंड थंडी रात्रीच्या प्रहरी चढाई अशा कठीण परिस्थितीतही सकारात्मक विचार शिखर सर करण्यासाठी अधिक बळ देत होते. शिखर सर केल्यानंतर मोहिमेवरुन परतताना पाय घसरला सुदैवाने बचावले. एव्हरेस्ट शिखराची यशस्वी मोहीम आयुष्यभर ऊर्जा देत राहील. – सुविधा कडलग, एव्हरेस्ट वीर