किम कार्दाशियान घटस्फोटाच्या उंबरठ्यावर

न्यूयॉर्क – सोशलाईट म्हणून वावरणारी आणि रिअलिटी टीव्ही स्टार किम कार्दाशियान तिच्या केन वेस्ट या संगीतकार पतीपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त पीपल.कॉम या संकेतस्थळाने दिले आहे.

किम आणि केन यांचा विवाह 2014 मध्ये झालेला आहे. किमला कोणत्या मार्गाने जायचे आहे याची कल्पना केनला आलेली आहे आणि त्याने वास्तव स्वीकारायचे ठरवले आहे, असे माहितगारांचे म्हणणे आहे.

तिने त्याला सांगितले आहे की, भविष्याचा आराखडा ठरवण्यसाठी तिला स्पेस हवी आहे.
त्यावर केनने होकार दिलेला आहे. तो दुःखी आहे पण त्याचा होकार आहे. हे अटळ आहे आणि हे घडणार होते याची त्याला कल्पना होती. लवकरच घडेल असेही त्याला वाटत होते असे त्याच्या जवळच्या माहितगारांनी सांगितल्याचे या बातमीत म्हटले आहे.

केन वेस्टने जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे जाहीर केले तेव्हापासून दोघांमध्ये अस्वस्थता होती. त्यावेळी त्याने ट्विटरद्वारे खासगी आयुष्यातील माहितीही जाहीर केली होती. त्यावेळी तो दुभंग व्यक्तिमत्वाच्या व्याधीशी लढत असल्याने किमने शांत राहणे पसंत केले होते.
40 वर्षीय किम घटस्फोटासाठी तयारी करत असली तरी त्यांचे नाते वाचवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून दांपत्य समुपदेशन घेत असल्याचे सांगण्यात येते.

त्यामध्ये विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. अजूनही लग्नाचे नाते वाचवता येईल का या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जाते. दोघांनी कोणताही निर्णय घेतला तरी किमच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे कार्दाशियन कुटुंबियांनी ठरवले आहे. क्रिस जेन्नर आणि किमच्या बहिणी तिला शक्य तितके पाठबळ देत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.