Bhigwan Kidnapping Case : इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये एका २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, त्यानंतर समोर आलेल्या माहितीने अपहरण प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला. संबंधित २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाले नव्हते तर तिने तिच्या इच्छेने निघून गेल्याचे सांगत एक व्हिडीओ प्रसारित केला होता. ज्या मुलासोबत संबंधित तरुणी निघून होती. तिचे आणि तरुणाचे प्रेमसंबध असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथक रवाना करण्यात आली होती. मात्र, काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. नेमकं पोलिस ठाण्यात काय घडलं? भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर तिने स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. तसेच नेमकं काय घडलेलं, याबाबतही तरुणीने माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न ठरलं अन् त्या दिवशी…. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीचे लग्न ठरले होते. त्यामुळे भिगवणमध्ये आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना भरदिवसा तिचे अपहरण करण्यात आले. यावेळी तरुणीच्या आई व भावाला मारहाण करीत त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून अपहरण करण्यात आले. ही घटना 17 फेब्रुवारी या दिवशी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने भिगवणमध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. घटनेच्या रात्री मोठ्या संख्येने नागरिकांचा जमाव पोलिस स्टेशनच्या बाहेर जमला होता. आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी भिगवण बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर अपहरण झालेली तरुणी आणि तरुणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तरुणीने जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचा खुलासा केला होता. जहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षांपासून तिचे प्रेमसंबंधात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Bank Fraud : सहकारी बँकेला कोटींचा गंडा! ९१ लाखांचे सोने निघाले चक्क ‘बनावट’; व्हॅल्युएअरसह ४२ जण पसार