चिंचवडमधील अपहरणनाट्याला कलाटणी

Updated On:

पिंपरी – तरुणी काम करीत असलेल्या कार्यालयात जाऊन तरुणीचे पिस्तूलच्या जोरावर अपरहण केल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस ठाण्यात एका तरुणीच्या वडिलांनी दाखल केला. होता. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणास नवी कलाटणी मिळाली असून हा गुन्हा खोटा असून आपण स्वतःहून त्या तरुणासोबत गेल्याचे पीडित तरुणी हिने न्यायालयात शपथपत्र दिले.

शंतनू चिंचवडे (रा. पडपळ आळी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (दि. 19) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तरुणी काम करीत असलेल्या ठिकाणावरून पिस्तूल लावून तिचे अपहरण केल्याचा गुन्हा शंतनूवर दाखल झाला. त्यानंतर शंतनू याला अवघ्या चार तासात पोलिसांनी ताब्यात घेतले. आमच्या दोघांचे प्रेम संबंध आहेत. त्या तरुणीने माझ्याशी अबोला धरल्यामुळे मी तिच्या कार्यालयात गेलो. माझ्याकडे पिस्तूल नव्हते तर ते लायटर होते, असेही शंतनू याने पोलिसांना सांगितले. न्यायालयाने शंतनू याला एक दिवसांची पोलीस कोठडी दिली.

दरम्यान गुरुवारी (दि. 21) पुन्हा शंतनू याला न्यायालया हजर करण्यात आले. त्यावेळी पीडित तरुणीही न्यायालयात हजर होती. “”आपण स्वतः दुचाकी चालवत त्याच्यासोबत गेले होते. जाताना आम्हाला 12 ते 15 चौक लागले. जर अपहरण झाले असते तर एका तरी चौकात ओरडून मी नागरिकांची मदत मागितली असती. जे झाले ते माझ्या मर्जीने झाले. अपहरणाचा गुन्हा खोटा आहे, असे शपथपत्र पीडित तरुणीने न्यायालयात दिले असल्याची माहिती ऍड. अतिश लांडगे यांनी दिली. आता न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pimpri-Chinchwad: चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध

2026-10-07 08:45:36

Pimpri-Chinchwad: चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Pune Graduate constituency Election 2026: पुणे पदवीधरच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा?

2026-09-30 08:21:32

Pune Graduate constituency Election 2026: पुणे पदवीधरच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा?

Pimpri-Chinchwad : गणेशोत्‍सवात पीएमपी, मेट्रोची कोटीची उड्डाणे

2026-09-30 07:58:49

Pimpri-Chinchwad : गणेशोत्‍सवात पीएमपी, मेट्रोची कोटीची उड्डाणे

Pimpri-Chinchwad : डीजे वाजवणाऱ्यांवर तब्बल ९१ गुन्हे दाखल; पिंपरी-चिंचवडमध्ये ८६ प्रकरणांत साहित्य जप्त

2026-09-27 11:08:41

Pimpri-Chinchwad : डीजे वाजवणाऱ्यांवर तब्बल ९१ गुन्हे दाखल; पिंपरी-चिंचवडमध्ये ८६ प्रकरणांत साहित्य जप्त