Kiara Siddharth Video : गेल्या काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री कियारा अडवाणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनेही मुलीचे स्वागत मोठ्या उत्साहात केले होते. त्यानंतर पहिल्यांदाच ती तिचा पती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत शूटिंगच्या सेटवर दिसली आहे. सोशल मीडियावर दोघांचा एकत्र आले असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. १५ जुलै २०२५ या दिवशी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या आयुष्यात लक्ष्मीच्या पाऊलांनी एक गोंडस मुलगी आली. त्यांनी तिचे नाव सराया मल्होत्रा ठेवले आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडीओमध्ये कियारा आणि सिद्धार्थ एकत्र ओबी व्हॅनमध्ये चढताना दिसत आहेत. View this post on Instagram A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus) कियारा आणि सिद्धार्थ कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दोघांनाही एकत्र पाहून त्यांचे चाहते खूप आनंदी झाले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी “शेरशाह” चित्रपटात एकत्र काम केले होते. कियारा अडवाणी शेवटची हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर सोबत “वॉर २” मध्ये दिसली होती. आता कियारा कन्नड स्टार यशच्या “टॉक्सिक” चित्रपटात दिसणार आहे. कियारा या चित्रपटात नादियाची भूमिका साकारणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ”विवेन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट” मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया देखील दिसणार आहे. सध्या दोघेही त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त असल्याचे या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून लक्षात येत आहे. हेही वाचा : ओडिशात दगड खाणीत भीषण स्फोट! दोन मजुरांचा मृत्यू; अनेक मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती