‘मी सुशांतला सांगितले होते, कोणीतरी नक्कीच तुझ्यावर बायोपिक बनवेल’ : कियारा

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कियारा आणि कार्तिकचा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होण्याआधी अभिनेत्री सतत चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. अलीकडे एका मुलाखतीत कियाराने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजळा दिला. एके दिवशी कोणीतरी नक्कीच त्याच्या जीवनावर बायोपिक बनवेल. असे या मुलाखतीदरम्यान अभिनेत्री म्हणाली आहे.
कियारा म्हणाली, सुशांतचे आयुष्य इतके रंजक होते की, तिने अभिनेत्याला सांगितले होते की, एके दिवशी कोणीतरी नक्कीच त्याचा जीवनावर बायोपिक बनवेल. The Ranveer Show 201च्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही औरंगाबादमध्ये शूटिंग सुरू केले. तिथे आम्ही चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग करत होतो. मला आठवतं की आम्ही दिवसभर शूटिंग केलं आणि रात्री आठच्या सुमारास आम्ही पॅकअप झाले. दुसऱ्या दिवशी आमची सकाळची फ्लाइट होती. त्या आधल्या रात्री आम्ही रात्रभर गप्पा केल्या यावेळी सर्वजन खूप आनंद झाले होते. त्यावेळी मी सुशांतसोबत वेळ घालवला आणि त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. त्याने त्याचा प्रवास माझ्यासोबत शेअर केला. सुशांतने इंजिनीअरिंग कसे केले, प्रीती झिंटासोबत बॅकअप डान्सर म्हणून काम.. धोनी कसा मिळाला. त्याच्याकडे बरीच पुस्तके होती जी तो वाचत असे. मला आठवतं की हे सगळं जाणून घेतल्यानंतर मी सुशांतला म्हणाले होते की, कोणीतरी नक्कीच तुझ्यावर बायोपिक बनवेल. कारण त्याची कहाणी आणि प्रवास खूप रंजक होता.
सुशांतचे कौतुक करताना अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘तो खूप उत्साही होता. तो फक्त दोन तास झोपायचा, माणसाला फक्त 2 तास झोप लागते असे तो म्हणायचा. मानवी मेंदू फक्त 2 तास झोपतो, उर्वरित वेळ मेंदू सक्रिय राहतो. सेटवरही तो कधी थकत नव्हता. असा अभिनेत्रीने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.





