Kiara Advani: मुलीचा चेहरा न दाखवता कियाराने जिंकली चाहत्यांची मनं, सरायाहची गोड झलक शेअर

Kiara Advani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी हिने आपल्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच संयम ठेवला आहे. मागील वर्षी कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या आयुष्यात मुलगी सरायाह मल्होत्रा हिचा जन्म झाला. त्यानंतर कियारा फारशी सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही. आजवर या स्टार कपलने आपल्या लेकीचा चेहराही चाहत्यांसमोर आणलेला नाही.
अशातच कियाराने सोशल मीडियावर सरायाहची एक गोडशी झलक शेअर केली असून, ती पाहून चाहते भारावून गेले आहेत. जरी या व्हिडिओमध्ये सरायाहचा चेहरा दिसत नसला, तरी आई-मुलीमधील हा हळुवार क्षण चाहत्यांना खूप आवडला आहे.

कियारा आडवाणीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये कियारा हातात एक मॅगझिन धरून बसलेली दिसते, ज्याच्या कव्हरवर तिचाच फोटो आहे. तिच्या कुशीत लहानगी सरायाह आहे. कियारा मुलीला विचारते, “तुला मम्माची मॅगझिन पाहायची आहे का? चल बघूया मम्मा कुठे आहे.” त्यानंतर ती मॅगझिनची पानं उलटते आणि आपला फोटो दाखवते. त्याच क्षणी सरायाहची छोटी बोटं त्या फोटोवर दिसतात. हा क्षण अतिशय गोड आणि भावूक आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओसोबत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “मी आणि माझी मिनी मॅगझिन वाचत एन्जॉय करत आहोत.” सरायाहची ही छोटीशी झलक पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे.
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी १५ जुलै २०२५ रोजी आपल्या मुलीचं स्वागत केलं होतं. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांनी चाहत्यांना मुलीचं नाव जाहीर करत तिचं नाव सरायाह मल्होत्रा असल्याचं सांगितलं. त्यांनी तिला आपली “राजकुमारी” असंही म्हटलं होतं.
कामाच्या आघाडीवर पाहिलं तर कियारा आडवाणी अलीकडेच ऋतिक रोशनसोबत ‘वॉर 2’मध्ये दिसली होती. आता ती लवकरच यशसोबत ‘टॉक्सिक’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक काही दिवसांपूर्वी समोर आला होता आणि तो प्रेक्षकांना खूपच आवडला. ‘टॉक्सिक’ हा चित्रपट १९ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.




