Kia Seltos : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आपल्या लूक आणि फीचर्समुळे प्रसिद्ध असलेल्या ‘किआ सेल्टोस’ (Kia Seltos) ने आता सुरक्षेच्या बाबतीतही नवा विक्रम केला आहे. ‘भारत NCAP’ (B-NCAP) क्रॅश टेस्टमध्ये या SUV ने तब्बल ५ स्टार रेटिंग पटकावले असून, सुरक्षित गाडी शोधणाऱ्या ग्राहकांसाठी सेल्टोस आता एक भक्कम पर्याय बनली आहे. विशेष म्हणजे, या रेटिंगसह सेल्टोसने टाटा सिएराच्या (Tata Sierra) एकूण स्कोअरलाही मागे टाकले आहे. प्रौढांच्या सुरक्षेत दमदार कामगिरी (Adult Occupant Protection) प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आलेल्या चाचणीत सेल्टोसने ३२ पैकी ३१.७० गुण मिळवले आहेत. फ्रंटल ऑफसेट टेस्ट: १६ पैकी १५.७० गुण. साइड मूवेबल टेस्ट: १६ पैकी १६ पूर्ण गुण. चाचणी दरम्यान ड्रायव्हरचे डोके, छाती, कंबर आणि पायांना ‘गुड’ (उत्कृष्ट) रेटिंग मिळाले आहे. समोर बसलेल्या प्रवाशाचे सर्व महत्त्वाचे अवयव सुरक्षित असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हेही वाचा : शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1636 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले लहान मुलांच्या सुरक्षेतही अव्वल (Child Occupant Protection) मुलांच्या सुरक्षेसाठी (COP) या गाडीने ४९ पैकी ४५ गुण मिळवले आहेत. डायनॅमिक टेस्टिंग आणि चाईल्ड रिस्ट्रेंट सिस्टम (CRS) इन्स्टॉलेशनमध्ये या SUV ने पूर्ण गुण मिळवून आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. १८ महिने आणि ३ वर्षांच्या मुलांच्या डमीवर केलेल्या चाचणीत फ्रंटल आणि साईड क्रॅशमध्ये सेल्टोसने उत्तम कामगिरी केली. स्टैंडर्ड सेफ्टी फीचर्स – किआ इंडियाने आपल्या नवीन जनरेशनच्या सेल्टोसमध्ये सुरक्षेवर विशेष भर दिला आहे. गाडीच्या बेस व्हेरिएंटपासूनच खालील फीचर्स स्टँडर्ड (Standard) म्हणून मिळतात. यामध्ये ६ एअरबॅग्स, ABS आणि ESC (Electronic Stability Control), सर्व चाकांना डिस्क ब्रेक्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल-स्टार्ट असिस्ट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाईल्ड सीट माउंट्स यांचा समावेश आहे. किंमत आणि बुकिंग – १०.९९ लाख ते १९.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीत उपलब्ध असलेल्या या SUV ची बुकिंग २५,००० रुपयांच्या टोकन रकमेसह सुरू आहे. जानेवारी महिन्यापासून या गाड्यांची डिलिव्हरी देखील सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या बाबतीत झालेल्या या सुधारणेमुळे किआ सेल्टोस आता केवळ स्टाईलमध्येच नाही, तर प्रवाशांच्या जिवाच्या रक्षणातही देशातील सर्वात सुरक्षित गाड्यांच्या यादीत सामील झाली आहे.