Kia Motors | SUV 2026 Kia Sorento – ‘Kia Motors’ लवकरच भारतीय बाजारात आपली पहिली हायब्रिड ‘SUV 2026 Kia Sorento’ लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ही SUV भारतात प्रथमच टेस्टिंगदरम्यान दिसली असून, Kia च्या लाइनअपमध्ये ती Seltos च्या वरच्या सेगमेंटमध्ये स्थान मिळवेल. थर्ड-रो सीटिंगसह ही मोठी SUV Toyota Fortuner सारख्या प्रीमियम गाड्यांना थेट टक्कर देऊ शकते. दक्षिण कोरियात Sorento अनेक इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे, ज्यात हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिड दोन्ही टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. भारतात ही SUV 2026 मध्ये लॉन्च होऊ शकते आणि Kia च्या भारतीय लाइनअपमधील पहिली हायब्रिड SUV ठरेल. Sorento चे डिझाइन – बॉक्सी आणि रफ-टफ SUV लूक : टेस्टिंगदरम्यान जरी गाडी पूर्णपणे कव्हर केलेली असली तरीही तिचे प्रमुख डिझाइन घटक स्पष्ट दिसले. Kia ची सिग्नेचर टायगर-नोज ग्रिल टी-आकाराच्या LED DRL उंच, दमदार बोनट चौकोनी व्हील आर्चेस 19-इंच अलॉय व्हील फ्लॅट टेलगेट ग्लोबल मॉडेलचे माप: लांबी – 4.8 मीटर व्हीलबेस – 2,800 mm या मापनांमुळे Sorento अत्यंत प्रशस्त आणि प्रॅक्टिकल SUV ठरते. एकूणच, या SUV चे डिझाइन तिला प्रीमियम आणि हाय-एंड लूक देते. हायब्रिड तंत्रज्ञान प्लस अत्याधुनिक फीचर्स असलेला इंटिरियर : इंटिरियरचे अधिकृत तपशील अद्याप जाहीर झाले नसले तरी भारतीय मॉडेलमध्ये ग्लोबल आवृत्तीप्रमाणेच फिचर-लोडेड केबिन मिळण्याची शक्यता… पॅनोरमिक कर्व्ड डिजिटल स्क्रीन सेटअप ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल वायरलेस Android Auto / Apple CarPlay वायरलेस चार्जिंग 12-स्पीकर Bose साउंड सिस्टम सुरक्षा फीचर्समध्ये मिळू शकतात : मल्टीपल एअरबॅग ADAS (अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम) 360-डिग्री कॅमेरा ESC, हिल-स्टार्ट असिस्ट अॅडव्हान्स ब्रेकिंग सिस्टम रोटरी डायल गिअर सेलेक्टर हे स्पष्ट संकेत देतो की भारतात Sorento हायब्रिड अवतारातच येणार आहे. इंजिन पर्याय: भारतात 1.5L हायब्रिडची शक्यता ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध इंजिन: 1.6L टर्बो हायब्रिड 1.6L प्लग-इन हायब्रिड 2.5L पेट्रोल 2.5L टर्बो पेट्रोल भारतासाठी Kia आपला 1.5-लीटर पेट्रोल इंजिन हायब्रिड सेटअपसह उपलब्ध करून देऊ शकते. यामुळे Sorento भारतीय SUV मार्केटमध्ये मायलेज + पावर + लग्जरीचा जबरदस्त मिलाफ घेऊन येणार आहे. किंमत आणि संभाव्य स्पर्धक : भारतामध्ये 2026 Kia Sorento Hybrid ची किंमत अंदाजे ₹35 लाखांपासून सुरू होऊ शकते. लॉन्चनंतर ही SUV पुढील मॉडेलना टक्कर देईल: Toyota Fortuner Skoda Kodiaq MG Gloster 2026 Kia Sorento Hybrid ही Kia साठी भारतातील एक महत्त्वाची SUV ठरणार आहे. दमदार हायब्रिड इंजिन, प्रगत तंत्रज्ञान, तीन-रांगांची सीटिंग आणि प्रीमियम डिझाइनमुळे Sorento भारतीय SUV सेगमेंटमध्ये एक मोठे आणि जबरदस्त पाऊल ठरणार आहे.