Kia चा धमाका, भारतात लाँच केली प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही, एकदा चार्ज केल्यावर 663KM धावणार

Kia EV6 Launched | Kia India ने भारतीय इलेक्ट्रिक बाजारात नवीन प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करत धमाका केला आहे. कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्ही EV6 ला लाँच केले आहे. कंपनीने जानेवारी 2025 मध्ये झालेल्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये या कारला सादर केले होते. कारमध्ये 84kWh बॅटरी पॅक दिला आहे. कार एकदा चार्ज केल्यावर 663 किमी अंतर पार करू शकते. या कारची किंमत 65.9 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Kia EV6 कारविषयी सविस्तर जाणून घेऊया.
नवीन किआ EV6 चा लुक पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी आणि आकर्षक आहे. यामध्ये स्टार मॅप ग्राफिक DRLसह नवीन एलईडी लाइट्स, जीटी लाइन फ्रंट बंपर आणि 19-इंच एरोडायनामिक एलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, जे या कारला शानदार लूक प्रदान करतात.
इंटीरियरबद्दल सांगायचे तर किआ EV6 चे कॅबिन अत्यंत प्रीमियम आणि आरामदायक बनवण्यात आले आहे. यात 12.3-इंच ड्युअल पॅनोरॅमिक कर्व्ड डिस्प्ले, नवीन डी-कट स्टेअरिंग व्हील आणि हँड्स-ऑन डिटेक्शन तंत्रज्ञान यासारखे नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
या इलेक्ट्रिक कारमध्ये किआ कनेक्ट 2.0 देण्यात आला आहे, जो ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट सपोर्ट करतो. याच्या मदतीने 34 ECU कंट्रोलर अपडेट करता येते. यामध्ये डिजिटल की 2.0 देण्यात आली आहे, ज्यामुळे स्मार्टफोनला वर्च्युअल की म्हणून वापरता येते. याशिवाय, कारमध्ये 100+ कनेक्टेड फीचर्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंग अनुभव आणखी शानदार होतो.
नवीन किआ EV6 मध्ये ADAS 2.0 (एडवांस्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) पॅकेज देण्यात आले आहे, ज्यामध्ये 27 अॅडव्हान्स्ड सुरक्षा फीचर्स आणि 5 नवीन ऑटोनॉमस फीचर्स जोडले गेले आहेत. ही इलेक्ट्रिक कार 84-kWh बॅटरी पॅकसह येते. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये कार 663 किमी रेंज प्रदान करते. तसेच, किआच्या 350 kW फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे कार 18 मिनिटात 10% ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.



