खुशी कपूरने दिली प्रेमाची कबुली; ‘त्या’ फोटोमुळे झाले कन्फर्म

Khushi Kapoor | बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. खुशी कपूरचं नाव सध्या अभिनेता वेदांग रैनाबरोबर जोडलं जात आहे. अनेक कार्यक्रमांमध्येही वेदांग आणि खुशी कपूर एकत्र पाहायला मिळतात. यातच आता खुशीचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने वेदांग नावाचे ब्रेसलेट घातले असल्याचा दावा काही चाहत्यांकडून केला जात आहे.
वेदांग आणि खुशी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र दोघांनीही डेटींगच्या चर्चांवर भाष्य केले नाही. खुशी सध्या परदेशात तिच्या सुट्या एन्जॉय करीत आहे. नुकतेच खुशीने तिचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र यातील खुशीच्या ब्रेसलेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या फोटोतील खुशीच्या ब्रेसलेटला झूम करून पाहिले तर त्यावर वेदांगचे नाव लिहिलेले दिसेल, हे पाहिल्यानंतर युजर्स तिच्या पोस्टवर कमेंट करत आहेत की तिने तिचे नाते कन्फर्म केले आहे.
View this post on Instagram
खुशी आणि वेदांग या दोघांमधील नात्याची आजवर अनेकदा चर्चा झाली आहे. त्यावर आता खुशीच्या ब्रेसलेटवर वेदांगचं नाव दिसल्यानं चाहत्यांना या दोघांच्या नात्याची खात्री पटली आहे. यावर एका यूजरने ‘आम्ही सर्वांनी खुशीच्या ब्रेसलेटवर तुझे नाव पाहिले आहे, प्रत्येक मुलाखतीत तू सिंगल आहेस हे बोलणे थांबवायला हवे’, असे म्हंटले आहे.
दरम्यान, खुशीने नुकताच तिचा २४ वा वाढदिवस साजरा केला होता. वेदांगनेही या पार्टीलाही हजेरी लावली होती. खुशीने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या पार्टीत शनाया कपूर आणि अंजिनी धवननेही हजेरी लावली होती. तर दुसरीकडे खुशीची बहीण अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांच्या नात्याबद्दल सुद्धा अनेकदा चर्चा रंगल्या. त्यावर जान्हवीनं स्वत: आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे.
हेही वाचा:





