Khuda Haafiz 2: ‘या’ तारखेला होणार ‘खुदा हाफिज 2’ प्रदर्शित

मुंबई – बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल आणि अभिनेत्री शिवालीका ओबेरॉय स्टारर थ्रिलर चित्रपट ‘खुदा हाफिज’ प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला होता. या चित्रपटाचे यश पाहून आता निर्मात्यांनी त्याच्या दुसऱ्या भागाबाबत मोठी घोषणा केली आहे. नुकतीच ‘खुदा हाफिज 2’ च्या प्रदर्शनाची तारिख निर्मात्यांनी जाहीर केली आहे.
याबाबतची अभिनेता विद्युत जामवालने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या तारखेची घोषणा केली आहे. हे पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने लिहिले की, खुदा हाफिज 2 मध्ये समीर आणि नरगिस यांच्या अग्नीपरीक्षेचा साक्षीदार बनलेला हा चित्रपट 17 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अॅक्शन हिरोपैकी एक असलेल्या विद्युत जामवालने गेल्या वर्षी जुलैमध्ये अभिनेत्री शिवलीका ओबेरॉयसोबत खुदा हाफिज चॅप्टर 2 चे शूटिंग सुरू केले. त्याचबरोबर आता अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. समोर आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये, अभिनेता केस आणि दाढी असलेल्या कैद्याच्या गणवेशात दिसत आहे. खुदा हाफिज चॅप्टर 2 हा विद्युत जामवालच्या 2020 मध्ये रिलीज झालेल्या खुदा हाफिजचा सीक्वल आहे. चित्रपटाचा पहिला भाग हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता.





