प्रभात वृत्तसेवा वाल्हे – वाल्हे नजिक मधलामळा (ता.पुरंदर) येथील भर वस्तीमधील घराजवळील, गोठ्यात बांधलेल्या खिल्लार जातीच्या खोडांवर बिबट्याने हल्ला चढवून ठार केले.वाल्हे येथील आद्यरामायणकार महर्षि वाल्मिक ऋषींची संजीवनी समाधी मंदिराजवळील, वरचामळा येथील तुषार भुजबळ यांनी नेहमीप्रमाणे गुरूवार (दि.३१) राञी गोठ्यामध्ये,दोन गाई व एक खिल्लार जातीचे खोंड बांधले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास, भुजबळ यांनी गोठ्यात पाहिले असता चार महिन्यांचे खिल्लार जातीचे खोंड मुर्त अवस्थेत आढळून आले. दरम्यान,शेतकरी तुषार भुजबळ यांनी वन विभागाशी संपर्क साधून, वनविभागाला माहिती देण्यात आली. सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले,वनपाल दिपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अशोक फडतरे,वन कर्मचारी किरण पवार,हनुमंत पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन, पंचनामा केला.जवळ असलेल्या पिंगोरी परिसरातील डोंगर भागात मागील काही वर्षांपासून बिबट्याच्या हल्यात अनेक पशुधन,वन्यजीव मारले गेले आहेत.बिबट्या आता मानवी वस्तीजवळ आल्याने, शेतकरीवर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेले खोंड खिल्लार जातीचे होते. यामुळे या शेतकऱ्यांचे जवळपास पंचवीस हजार रूपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,शेतकऱ्यांला तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तसेच वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून,लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. कोट-“शेतकऱ्यांनी बिबट्या व अन्य हिंस्र प्राणी गोठ्यात जाऊ नये,यासाठी गोठे बंदिस्त करावेत.शक्यतो गोठ्यामध्ये विजेची सुविधा चालु ठेवावी.तसेच राञीच्या वेळी गोठ्याला दिवाळीतील कलमधील दिव्याच्या लाईटच्या माळा लावाव्यात.यामुळे बिबट्या,तसेच हिंसक वन्य प्राणी गोठ्याजवळ येणार नाहीत”.- दिपाली शिंदे,वनपाल जेजुरी