खेडचे सभापती पायउतार; अविश्वास ठराव ११ विरूद्ध ३ मतांनी मंजूर

Updated On:
खेडचे सभापती पायउतार; अविश्वास ठराव ११ विरूद्ध ३ मतांनी मंजूर

राजगुरुनगर – खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास हात वर करून मंजूर करण्यात आला. दरम्यान पोलीस कोठडीत असलेले सभापती पोखरकर याना अविश्वासावरील सभेसाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर ५०० मीटर पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली होती. 

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या ६ राष्ट्रवादी ४ आणि भाजपा उपसभापती चांगदेव शिवेकर यांच्यासह ११ सदस्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे २४ मे रोजी अविश्वास ठराव दाखल केला आहे. आज दि. ३१ रोजी अविश्वास ठरावावर विशेष सभा प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी बोलावली होती. या सभेत हात वर करून अविश्वास ठराव घेण्यात आला. 

 

सुनिता सांडभोर, वैशाली जाधव, सुभद्रा शिंदे, मंच्छीद्र गावडे, अमर कांबळे, अंकुश राक्षे तर राष्ट्रवादी चे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे, तर भाजपाचे विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर अशा ११ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले. तर सभापती भगवान पोखरकर, माजी उपसभापती ज्योती अरगडे आणि अमोल पवार यांनी भगवान पोखरकर यांच्या बाजूने कौल दिला.

अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर बाजू मांडण्यापासून सभापती पोखरकर याना पोलिसांनी मज्जाव केला त्यांना त्यांची बाजू मांडू दिली नाही. पोखरकर यांनी जाता जाता सांगितले, ठराव दाखल करण्यामागे तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांचा वाटा आहे. पंचायत समिती इमारतीला ठरलेल्या जागेला विरोध केला म्हणून माझ्यावर अविश्वास आणला.

माजी उपसभापती ज्योती अरगडे म्हणाल्या, पक्षाच्या विरोधात जाऊन शिवसेनेच्या काही सदस्यांनी शिवसेना पक्षाशी व स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे, माजी खासदार आढळराव पाटील यांच्याशी बेईनामी केली आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी पंचायत समिती मध्ये खालच्या पातळीवर राजकारण केले आहे. माझ्या नवऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवले आहे.

माजी उपसभापती अमोल पवार यांनी सांगितले, खेड पंचायत समितीच्या इमारतीच्या जागेला सभापती भगवान पोखरकर यांचा विरोध आहे म्हणून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला आहे. सदस्यांवर दबाव आणून अविश्वास ठराव मांडला. तो मांडत असताना शिवसेनेच्या दोन सदस्यांनी हात वर केले नव्हते.

एका माजी सभापतीने हात वर करा असे सांगितले म्हणून त्यांनी हात वर केले. या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. पसला मोठं गालबोट लागले आहे. गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण झाले आहे नेतृत्व चुकीचे असल्याने यापुढेही तालुक्यात असेच राजकारण होणार आहे.

दरम्यान तालुक्यात या राजकीय नाट्यामुळे एकाच खळबळ उडाली होती. सभापती भागांना पोखरकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ११ विरोधी ३ ने मंजूर झाल्याने या राजकीय नाट्याचा पहिला भाग पूर्ण झाला असून आता पुढे पंचायत समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? सभापती राष्ट्रवादी चा कि शिवसेनेचा. शिवसेना पक्ष काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rajgurunagar : अधिकार्‍यावरील हल्ल्यानंतर कर्मचारी संतप्त

2026-10-07 08:15:54

Rajgurunagar : अधिकार्‍यावरील हल्ल्यानंतर कर्मचारी संतप्त

Pune District : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत द्या

2026-10-07 07:45:26

Pune District : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत द्या

Pune District : राजगुरुनगरात साडेसहा तास जल्लोष

2026-09-27 07:39:14

Pune District : राजगुरुनगरात साडेसहा तास जल्लोष

Pune District : संधी मिळाल्यास पीडीसीसी निवडणूक लढणार - किरण आहेर

2026-09-27 07:33:52

Pune District : संधी मिळाल्यास पीडीसीसी निवडणूक लढणार - किरण आहेर

Pune District : खेड तालुक्यात दुसरे तहसीलदार कार्यालय

2026-09-24 08:23:22

Pune District : खेड तालुक्यात दुसरे तहसीलदार कार्यालय