Khatron Ke Khiladi 15 Winner: ‘खतरों के खिलाडी १५’चा अविनाश मिश्रा ठरला विजेता; ट्रॉफीसह मिळाले लाखोंचे बक्षीस
Khatron Ke Khiladi 15 Winner : अविनाशला आनंदाश्रू अनावर

Khatron Ke Khiladi 15 Winner : लोकप्रिय रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी १५’चा विजेता अविनाश मिश्रा ठरला आहे. अविनाश मिश्राने टॉप ३ फायनलिस्ट ऋत्विक धनजानी आणि ओरीला हरवून ‘खतरों के खिलाड़ी १५’ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.
विजेतेपदासह अविनाशने २० लाख रुपयांचे बक्षीस, युरोपची ट्रिप आणि एक कारही जिंकली. टॉप ३ फायनलिस्टला एक बाइकही देण्यात आली. ‘खतरों के खिलाडी १५’ चे शूटिंग केप टाउन, दक्षिण आफ्रिकामध्ये झाले. यंदा ‘चॅम्पियन्स विरुद्ध चॅलेंजर्स’ हे रोमांचक स्वरूप पाहायला मिळाले. अखेर सध्या अविनाशने विजेतेपदावर नाव कोरल्याने त्याच्या या यशाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
यापर्वात अनेक थरारक स्टंट्स पाहायला मिळाले. अविनाशची इच्छाशक्ती आणि स्टंट्समधील उत्कृष्ट कौशल्य यामुळे तो ‘खतरों के खिलाडी १५’ विजेता ठरला आहे. रोहित शेट्टीने अविनाशचे नाव विजेता म्हणून जाहीर करताच, त्याला आनंदाश्रू अनावर झाले. सुरुवातीपासूनच अविनाश मिश्रा शोमध्ये सर्वात मजबूत परफॉर्मर्समध्ये एक म्हणून उभा राहिला आहे.
अविनाशने २०१६ मध्ये ‘सेठजी’पासून अभिनयाची सुरुवात केली आणि नंतर २०१७ मध्ये ‘इश्कबाज’मध्ये तो दिसला होता. २०१८ मध्ये ‘मरियम खान रिपोर्टिंग लाइव’मधील त्याच्या कामगिरीने त्याला ओळख मिळवून दिली. २०२२ च्या ‘नाथ’ या शोच्या यशानंतर अविनाश २०२४ मध्ये ‘बिग बॉस १८’मध्ये दिसला.
हेही वाचा:
Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकर पुण्यात MPSCच्या आंदोलनात येताच, विद्यार्थांकडून ‘गो बॅक’चा नारा





