खरगेंचा सरकारवर मोठा आरोप: ‘बंगाल निवडणुकीसाठी मुद्दाम वाद उकरून काढला’; बेरोजगारी, रुपयाच्या घसरणीवर तीव्र शब्दांत टीका

नवी दिल्ली: ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यसभेत झालेल्या चर्चेला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र राजकीय वळण दिले आहे. केंद्र सरकारवर हल्लाबोल करत त्यांनी थेट आरोप केला की, आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद मुद्दाम उकरून काढण्यात आला आहे, जेणेकरून जनतेचे लक्ष बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था आणि सामाजिक समस्यांसारख्या मूळ प्रश्नांवरून हटवता यावे. ‘वंदे मातरम्’ला खरी श्रद्धांजली घोषणांनी नव्हे, तर संसदेत जनतेच्या समस्या सोडवूनच दिली जाऊ शकते, असे खर्गे ठामपणे म्हणाले.
‘५६ इंच’ छातीचा काय उपयोग?
जवळपास एक तास चाललेल्या आपल्या भाषणात खरगे यांनी देशाच्या आर्थिक स्थिती आणि विदेश नीतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी विशेषतः रुपयाच्या अवमूल्यनाचा उल्लेख केला. “संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) काळात डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ ते ६० च्या घरात होता, तो आता ९० च्या पार गेला आहे,” असे ते म्हणाले.
परराष्ट्र धोरणांवर बोलताना त्यांनी दक्षिण आशियातील भारताचा घटता प्रभाव दर्शवला. चीनचा वाढता प्रभाव, नेपाळचे गुंतवणुकीसाठी चीनकडे पाहणे आणि बांगलादेशचा त्रिपक्षीय बैठकांमध्ये सहभाग, या घटनांचा दाखला देत खरगे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “चीनच्या विरोधात एकही शब्द बोलला जात नाही, मग ५६ इंच छातीचा काय उपयोग?” असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.
देश आर्थिक संकट, बेरोजगारी और कई सामाजिक मुद्दों से जूझ रहा है, लेकिन प्रधानमंत्री ने सदन में इसपर चर्चा नहीं की। उनका ध्यान सिर्फ चुनावी प्रचार पर रहता है।
प्रधानमंत्री ने सदन में ‘वंदे मातरम्’ पर चर्चा सिर्फ इसलिए रखी है, क्योंकि बंगाल में चुनाव हैं।
लेकिन PM मोदी इस गलतफहमी… pic.twitter.com/3Mv0zOnV6u
— Congress (@INCIndia) December 9, 2025
नेहरूंचा निर्णय सामूहिक: खरगे
यावेळी खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांवर जवाहरलाल नेहरूंचा अपमान केल्याचाही आरोप केला. ‘वंदे मातरम्’चे पहिले दोन कडवेच राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय एकट्या नेहरूंचा नव्हता, तर महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस आणि इतर नेत्यांच्या संमतीने घेतलेला सामूहिक निर्णय होता, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने नेहमीच ‘वंदे मातरम्’चा आदर केला आहे आणि असहकार चळवळीपासून स्वातंत्र्य संग्रामापर्यंत काँग्रेस कार्यकर्ते हे गीत गातच तुरुंगात जात असत, यावर त्यांनी जोर दिला.
सत्तापक्षाकडून आक्षेप –
खरगे यांच्या या तीव्र टिप्पण्यांवर सत्तापक्षाने लगेच आक्षेप घेतला. सभागृहाचे नेते जेपी नड्डा यांनी खरगे विषयापासून भरकटत असल्याचे म्हटले, तर सभापती सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना मूळ चर्चेपुरते मर्यादित राहण्याचा सल्ला दिला. यावर खरगे यांनी उत्तर दिले की, राष्ट्रीय गीताचा आदर हा चर्चेचा नव्हे, तर उत्सवाचा विषय आहे आणि सरकार याला राजकीय ढाल बनवून आपल्या अपयशांवर पांघरूण घालत आहे. भाषणाच्या समारोपात त्यांनी सांगितले की, निवडणुका येत-जात राहतील, पण ‘वंदे मातरम्’चा आदर नेहमीच सर्वोपरी राहिला पाहिजे.





