Rupali Chakankar : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातची विशेष तपास पथकाकडून (SIT) कसून चौकशी केली जात आहे. खरातचे अनेक राजकीय नेते मंडळींसोबत संबंध असल्याचे समोर आले. खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले आहे. रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका संस्थान या ट्रस्टच्या विश्वस्त होत्या. त्यामुळे आता या प्रकरणात त्याच्यावर अनेक आरोप केले जात आहे. रुपाली चाकणकर यांना याप्रकरणी राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता रुपाली चाकणकर यांना एसआयटीकडून चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याद्वारे त्यांचे जबाब नोंदवले जाऊ शकतात. दरम्यान, शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटीकडून आता चौकशी होणार आहे. Rupali Chakankar Rupali Chakankar ‘शिवनिका’ संस्थेचे सर्व सदस्य चौकशीच्या फेऱ्यात मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने स्थापन केलेल्या ‘शिवनिका’ संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार घडले. या संस्थेवर विविध वेळी कार्यरत असलेल्या सर्व आजी-माजी सदस्यांची आता एसआयटीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. या सदस्यांना लवकरच चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असून, संस्थेच्या निधीचा वापर आणि खरातला मिळालेले पाठबळ यावर पोलीस लक्ष केंद्रित करत आहेत. एसआयटीने ‘शिवनिका’ संस्थेचे बँक खात्यांचे तपशील आणि मागील काही वर्षांतील व्यवहारांची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर आता मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. Rupali Chakankar : हेही वाचा : Viraj Jagtap : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा अपघात; हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ, नेमकं काय घडलं?