‘खालिद का शिवाजी’ वादाच्या भोवऱ्यात; राज्य सरकारने थेट केंद्र सरकारला पत्र लिहीत केली महत्त्वाची मागणी

Khalid Ka Shivaji Movie Controversy | ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. येत्या 8 ऑगस्ट रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी हिंदू महासंघाकडून केली जात आहे. या प्रकरणाची दखल घेत चित्रपटासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.
केंद्राकडे पुनर्परीक्षणाची विनंती
या पत्रामध्ये राज्य सरकारकडून केंद्राकडे पुनर्परीक्षणाची विनंती करण्यात आली आहे. राज्य पुरस्कार समारंभात या चित्रपटाविरोधात निदर्शने झाली होती. हा चित्रपट 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे, अशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती राज्य सरकारकडून या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्याकडून माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रालयानं थेट हस्तक्षेप करत चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरते थांबवण्याची शिफारस या पत्राद्वारे करण्यात आली आहे. Khalid Ka Shivaji Movie Controversy |
दरम्यान, ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे आणि ऐतिहासिक पुरावे नसलेले दावे केल्यामुळे शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नुकतेच राज्य पुरस्कार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या चित्रपटाविरोधात निदर्शने झाली होती. ज्यामध्ये चित्रपटावर बंदी घालण्याची आणि वादग्रस्त संवाद काढण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने थेट केंद्राला पत्र लिहित महत्त्वाचे पाऊल उचललं आहे .Khalid Ka Shivaji Movie Controversy |
हेही वाचा :





