Girish Mahajan | पुण्यातील खराडी येथील उच्चभ्रू परिसरातील रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये २ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. शनिवारी रात्री उशिरा पुणे गुन्हे शाखेच्या पथकाकडून छापा टाकत धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका बड्या महिला नेत्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांचे पती प्राजंल प्रांजल खेवलकर यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे आता राजकारण मोठी खळबळ उडाली आहे. खराडीमधील अलिशान फ्लॅटमध्ये प्रांजल ३ महिला आणि मित्रासोबत नशेत धुंद होते. पोलिसांनी धाड टाकत सर्वांना ताब्यात घेतले, याप्रकरणी एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Girish Mahajan | मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, याप्रकरणात पोलिस तपास करत आहे. त्यामुळे याविषयीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण जी माहिती हाती आली आहे, त्यानुसार, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे या पार्टीत होते. त्यांचा समावेशच नव्हता तर त्यांनी ही पार्टी आयोजित केली होती, असा आरोप महाजन यांनी केला. Girish Mahajan | ‘दोषींवर कारवाई झाली पाहिजे’ कुटुंबातील सदस्याला अडकवण्यात येईल असे आपल्याला पूर्वीपासून वाटतं होते. अशा घटनेची पूर्वकल्पना होती, अशी प्रतिक्रिया नाथाभाऊंनी दिल्याचे माध्यम प्रतिनिधींनी महाजन यांना सांगितले. त्यावर महाजनांनी ‘मग त्यांनी जावयाला अलर्ट करायला हवं होतं, हा तपासाचा भाग आहे. प्रत्येक वेळीच षडयंत्र कसे असेल, असा सवाल महाजन यांनी केला. 7-8 जणांचे मोबाईल तपासल्यावर समोर येईल. त्यांच्या जावयांना कोणी कडेवर घेतलं आणि तिथे नेऊन ठेवलं, असं तर झालं नाही ना? चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे,’ असा चिमटा महाजनांनी काढला. Girish Mahajan | पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये नेमकं काय झालं? पुण्यातील खराडी येथे रेव्ह पार्टीत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री अचानक धाड मारली. येथे हाऊस पार्टीच्या नावाखाली अलिशान फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीमधून पोलिसांनी 2 महिला आणि 5 जणांना ताब्यात घेतले आहे. Girish Mahajan | रेव्ह पार्टीमधून अंमली पदार्थ, दारू, हुक्का पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांची ससून रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. या रेव्ह पार्टीमध्ये खडसेंचे जावई असल्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. Girish Mahajan | हेही वाचा : Pune rave party : पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत रेव्ह पार्टी; बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात, गुन्हे शाखेची धडक कारवाई