लॉकडाऊनबद्दल खडसे म्हणाले..

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सप्तसूत्रीबी सुत्रीचे नागरिकांनी  पालन करावे असे अवाहन भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करताना सप्तसूत्रीचे नागरिकांनी पालन करावे असं सांगितलं होतं. त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जनतेने सरकारला सहकार्य करावे. बरेच जण कामे नसताना देखील सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. त्यामुळे प्रशासनाला ताण सहन करावा लागतो. पंतप्रधानांनी दिलेल्या सप्तसूत्रीचे तंतोतंत पालन केल्यास कोरोना विषाणूला नक्कीच हरवता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी, “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेले नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.