खडकी(प्रतिनिधी) – कोरोना साथीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खडकी कॅन्टोमेंट बोर्ड कसोशीने प्रयत्न करीत असून खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे सीईओ प्रमोद कुमारसिंह या सर्व परिस्थितीचा आढावा घेत असून गुरुवारी त्यांनी खडकी परिसराची पाहणी केली.
खडकीबाजार, रेंजहिल्स टाईप 1,टाईप2,दर्गावसाहत,इंदिरानगर झोपडपट्टी या ठिकाणी खडकी अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे. फायरमन प्रताप सिरसवाल सतिश कांबळे,राहुल गायकवाड,पंकज तायडे ,अतुल तारडे,ड्रायव्हर अभिजित दौंडकर यांनी ही फवारणी केली.