खादीचे मास्क ऑनलाइन उपलब्ध
Updated On:

नवी दिल्ली – खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे खादीचे मास्क आता ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. सुती मास्क तीस रुपयांना तर सिल्कचे मास 100 रुपयांना मिळतील ऑनलाइन पुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध केल्यामुळे नागरिकांना यासाठी खरेदी करण्यासाठी दुकानावर जावे लागणार नाही.
यासाठी किमान पाचशे रुपयांच्या ऑर्डरची अट आहे. चार प्रकारचे मास्क उपलब्ध करण्यात आले असून ग्राहकांना त्यातून निवड करता येईल. ऑनलाइन खरेदीची सुविधा फक्त भारतामध्ये उपलब्ध आहे.





