‘खडकवासला’ शंभर टक्के भरले; 3424 क्‍यूसेकने विसर्ग

Updated On:

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. दरम्यान, धरणातून कालव्याद्वारे 3424 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ओढे-नाले यांद्वारे धरणात पाणी जमा होत आहे. खडकवासला प्रकल्पात एकूण 10.62 टीएमसी म्हणजे 36.42 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मागील वर्षी याचदिवशी खडकवासला प्रकल्पात 9.39 टीएमसी इतका पाणीसाठा होता. बुधवारी खडकवासला धरणक्षेत्रात 8 मिमी, पानशेत-16 मिमी, वरसगाव-16 मिमी आणि टेमघर-40 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

खडकवासला धरणातून बुधवारी सायंकाळी 6 वाजता कालव्याद्वारे 300 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. यानंतर आज पहाटे दोन वाजता खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यामुळे सांडव्यातून 856 क्‍युसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यानंतर सकाळी सहा वाजता आणखी 856 क्‍युसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. आता एकूण 3424 क्‍युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

2026-09-29 06:45:13

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

2026-09-29 05:30:30

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

2026-09-13 05:30:19

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा

2026-08-09 05:15:33

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा

PMC Budget: अर्थसंकल्प बनविण्यात आता तुमचाही सहभाग! महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत मागवल्या सूचना...वाचा सविस्तर

2026-08-07 06:30:49

PMC Budget: अर्थसंकल्प बनविण्यात आता तुमचाही सहभाग! महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत मागवल्या सूचना...वाचा सविस्तर