South Cinema । भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत ज्यांच्या फ्रेंचाइजी खूप प्रसिद्ध आहे. चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात. त्यापैकी एक म्हणजे ‘KGF’ ज्याचे दोन भाग आधीच आले आहे. ‘केजीएफ’च्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली, आणि आता चाहत्यांना त्याच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे.
ज्यांनी KGF चित्रपटाचे दोन्ही भाग पाहिले आहेत ते तिसऱ्या भागाची वाट पाहत आहे, अशात चित्रपटाच्या तिसऱ्या भागा बाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी तिसऱ्या भागाबाबत एक मोठे अपडेट दिले आहे.
View this post on Instagram
‘KGF’चा तिसरा भाग येणार का? असा प्रश्न दिग्दर्शन प्रशांत नील यांना विचारला असता ते म्हणाले, ‘मी सध्या ‘सालार 2’ वर लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि ‘KGF’चा तिसरा भाग सध्या येत नाहीये.KGF 3 चित्रपटावर सध्या कोणतीही चर्चा झाली नाही, परंतु पुढे काय होईल हे कोणालाही माहिती नाही.’
‘केजीएफ’मुळे यशचे नशीब चमकले. दाक्षिणात्य अभिनेता यशने अनेक चित्रपट केले असले तरी केजीएफ या चित्रपटाने त्याचे करिअर नव्या उंचीवर गेले. ‘KGF’च्या दोन्ही भागांनी यशला सुपरस्टार बनवले आणि आज तो बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यशच्या वर्क फ्रंट बाबत सांगायचं झाल्यास, रामायण चित्रपटात यश रावणाची भूमिका साकारणार होता मात्र आता तो फक्त सहनिर्माता म्हणून जोडला जाणार आहे.