पवित्र भूमीच्या रक्षणासाठीचा संग्राम… सुनील शेट्टीच्या प्रमुख भूमिकेतील ‘केसरी वीर’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज

Kesari Veer-Legends Of Somnath Teaser | अभिनेता सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सूरज पांंचोली यांची प्रमुख भूमिका असलेला बहप्रतिक्षित ‘केसरी वीर: लिजेंड्स ऑफ सोमनाथ’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये कलाकार योद्ध्यांची शौर्यगाथा सांगताना दिसत आहेत.
हा चित्रपट वीर हमीरजी गोहिल यांच्यावर आधारित असून, त्यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिर वाचवण्यासाठी लढा दिला होता. या पीरियड-ड्रामा चित्रपटात वीर योद्धा हमीरजी यांची भूमिका अभिनेता सूरज पांचोली साकारत आहे.
चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, यातील अॅक्शन सिक्वेन्स, जबरदस्त संवाद आणि शौर्याने भरलेले दृश्य प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. ‘धर्म, आस्था आणि सोमनाथच्या पवित्र भूमीच्या रक्षणासाठीचा संग्राम’, असे कॅप्शन देत सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय खलनायकाची भूमिका साकारताना दिसेल. तर सूरज पंचोली त्याची आतापर्यंतची सर्वात वेगळी भूमिका या चित्रपटात साकारेल.
View this post on Instagram
अभिनेता सुनील शेट्टी सोमनाथ मंदिर वाचवण्यासाठी सूरज पंचोलीच्या साथीदाराच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमात अभिनेत्री आकांक्षा शर्माची देखील महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाद्वारे आकांक्षा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग वेळी अभिनेता सूरज पंचोलीला गंभीर दुखापत झाली होती.
दरम्यान, ‘केसरी वीर: लिजेंड्स ऑफ सोमनाथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रिन्स धीमान यांनी केले आहे. हा सिनेमा 14 मार्चला मोठ्या पडद्यावर रिलीज होईल.





