रिलीजच्या पहिल्याच दिवशी केसरी 2 चे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक; पोस्ट लिहित व्यक्त केल्या भावना

Kesari 2 | अभिनेता अक्षय कुमार आणि आर. माधवन यांचा बहुचर्चित केसरी चॅप्टर २: ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग’ चित्रपट १८ एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटात १९१९ मध्ये जालियनवाला बाग क्रूर हत्याकांडाची थराथक आणि अंगावर काटा आणणारी कथा दाखविण्यात आली आहे. ब्रिटीश राज्यकर्त्यांनी निरापराध भारतीय लोकांचा अत्यंत क्रूरपणे बळी घेतला होता.
त्यावेळी ब्रिटिश राजवटीविरुद्ध वकील सी. शंकरन नायर यांनी कायदेशीर लढा उभा केला होता. यावर आधारित हा चित्रपट आहे. रघु पलट आणि पुष्पा पलट यांच्या ‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये रिलीजच्या पहिल्याच दिवशी लोकप्रिय झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
चित्रपट पाहल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाविषयी भरभरून लिहिले आहे. चित्रपटातील कथा, अक्षय कुमार, आर माधवन यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले जात आहे. एक्सवरील एका वापरकर्त्याने लिहिले, “अक्षय कुमार या भूमिकेत खूपच सुंदर दिसतोय, हे पात्र त्याच्यासारख्या दमदार अभिनेत्यासाठी होते. आर माधवनची व्यक्तिरेखा देखील अद्भुत आहे आणि अनन्या पांडेने कथेनुसार तिचे पात्र खूप चांगले साकारले आहे.”
#KesariChapter2 is a powerful & emotionally charged film, this historical drama brings to life the tragic events of the Jallianwala Bagh massacre with heart-wrenching authenticity….
performance by #AkshayKumar & @ActorMadhavan
Must watch movie 👍#Kesari2 pic.twitter.com/g65hE4oDLz— Varsha Singh (@VarshaSingh_01) April 18, 2025
दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “केसरी चॅप्टर २ हा एक शक्तिशाली आणि भावनिक चित्रपट आहे. हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांडातील दुःखद घटनांना हृदयद्रावक सत्यतेने जिवंत करतो… अक्षय कुमार आणि आर माधवन यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट पाहण्यासारखा बनतो. हा चित्रपट नक्की पहा. “एका नकळत कथेला खूप धाडस, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलतेने सांगितले आहे. किती उत्तम आणि जादुई चित्रपट आहे., असल्याचे एका वापरकर्त्यांने लिहिले आहे.
#KesariChapter2 is a powerful & emotionally charged film, this historical drama brings to life the tragic events of the Jallianwala Bagh massacre with heart-wrenching authenticity….
performance by #AkshayKumar & @ActorMadhavan
Must watch movie 👍#Kesari2 pic.twitter.com/g65hE4oDLz— Varsha Singh (@VarshaSingh_01) April 18, 2025
या चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंह त्यागी यांनी केले आहे. तर चित्रपटाचे निर्माता करण जोहर आहे. अक्षय कुमारने वकील सी. शंकरन नायरची भूमिका साकारली आहे, तर आर माधवन ब्रिटिश क्राउन अॅटर्नी नेव्हिल मॅकिन्लीची भूमिकेत आहे. अनन्या पांडे दिलरीत गिलची भूमिका साकारत आहे, जी त्या काळात कायद्याचे शिक्षण घेतलेल्या महिलांपैकी एक होती.




