केरळ : भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी पीएफआयच्या 15 सदस्यांना मृत्यूदंड
Updated On:

थिरूवनंतपूरम – केरळमधील न्यायालयाने भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी १५ दोषींना मृत्यूदंड ठोठावला. संबंधित दोषी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे सदस्य आहेत. केरळमधील भाजपच्या ओबीसी मोर्चाचे नेते रणजीत श्रीनिवासन यांच्यावर त्यांच्या घरातच काही जणांनी हल्ला केला. त्या हल्ल्यात श्रीनिवासन मृत्युमुखी पडले.
ती घटना २०२१ या वर्षाच्या अखेरीस घडली. श्रीनिवासन यांच्या हत्या प्रकरणाचा खटला स्थानिक न्यायालयात चालला. त्या न्यायालयाने २० जानेवारीला १५ आरोपींना दोषी ठरवले. त्यांना मंगळवारी शिक्षा ठोठावण्यात आली. त्या निकालाचे भाजप आणि श्रीनिवासन यांच्या कुटूंबीयांनी स्वागत केले. श्रीनिवासन यांना न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.





