मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केली घोषणा
कोझिकोडे – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शुक्रवारी कोझीकोडेमधील करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान अपघातात ठार झालेल्या प्रत्येक प्रवाशांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
त्याचबरोबर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, मृतांसह अपघातातील सर्व जखमींची कोरोना चाचणीही करण्यात येईल. आतापर्यंत अपघातातील एकाचीच कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आलेली आहे.
Kerala CM Pinarayi Vijayan has announced a compensation of Rs 10 lakhs to the next of kin of each passenger who died in the #AirIndiaExpress crash that took place at the Karipur International Airport yesterday: Kerala Chief Minister’s Office (CMO) pic.twitter.com/TQy6vEOjve
— ANI (@ANI) August 8, 2020
दरम्यान, केरळमधील कोझिकोडमध्ये शुक्रवारी धावपट्टीवरून विमान घसरल्याची घटना समोर आली. कोझिकोडेमधील करीपूर विमानतळावर उतरताना एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरले. हे विमान दुबईहून प्रवासी घेऊन जात होते. विमान अपघातात आतापर्यंत दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 123 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत.