सूरज चव्हाणला केदार शिंदेंनी दिले खास गिफ्ट

Suraj Chavan | सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सूरज चव्हाणचे कौतुक केले जात आहे. आपल्या साधेपणाने त्याने सर्वांचे मनं जिंकले. बिग बॉसनंतरही केदार शिंदे आणि सूरज चव्हाणचं खास नातं बघायला मिळाले. नुकताच केदार शिंदेंनी सूरज चव्हाणसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत केदार शिंदे सूरजला त्यांच्या घरी घेऊन जाताना दिसतात. सूरज अत्यंत आदराने आणि प्रेमाने केदार शिंदेंना मिठी मारतो. पुढे केदार शिंदे सूरजला एक खास गिफ्ट देतात. या गिफ्टमध्ये एका बॉक्समध्ये विठ्ठलाची मूर्ती असलेली दिसली. याशिवाय सोनेरी रंगाच्या पादुका पाहायला मिळाल्या.
View this post on Instagram
दरम्यान, केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या फिनालेला सूरजवर ‘झापुकझुपुक’ सिनेमा काढणार असल्याचं सांगितलं. खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वत:चं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले. पण त्याहीवेळी त्याने स्वत:ची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथंपर्यंत पोहोचला आणि या पर्वाचा विजेताही ठरला.





