KDMC Mayor : महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर, अखेर आज अनेक महानगरपालिकांना महापौर (KDMC Mayor) मिळाला असून, कल्याण डोंबिवली आणि मीरा-भाईंदरमध्ये महापौर निवडला आहे. कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी (KDMC Mayor) शिवसेनेच्या हर्षाली थविल, तर मीरा भाईंदरमध्ये डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड झाली आहे. कल्याण डोंबिवलीत उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले हे बिनविरोध निवडून आले आहेत. हर्षाली थविल आणि राहुल दामले यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीवेळी ठाकरेसेनेचे सर्व ११ नगरसेवक गैरहजर होते. निवडणूक पार पडल्यावर ८ नगरसेवक सभागृहात आले. तसेच, मीरा भाईंदरमध्ये डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड झाली आहे. KDMC Mayor उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील यांची निवड झाली. मात्र, डिंपल मेहता यांच्या निवडीला महाराष्ट्र एकीकरण समितीने विरोध दर्शवला होता. यावरती, मी महाराष्ट्राची आहे असे म्हणत, त्यांनी मराठी एकीकरण समितीच्या विरोधावरही उत्तर दिले. मी महाराष्ट्राची मुलगी आहे. माझा जन्म इथला आहे, माझे वडील आणि माझी आई, सर्वांचा जन्म याच महाराष्ट्रामध्ये झाला आहे. माझ्याकडे ओबीसी महिलांच्या सर्टिफिकेट आहे तर मी बाहेरची कशी होऊ शकते, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये मराठी महापौरच बसावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीकडून पुन्हा एकदा मीरा-भाईंदर महापालिकेच्या बाहेर आंदोलन केले जाणार आहे. मीरा भाईंदर मध्ये मराठीच महापौर व्हावा, अशी मागणी मराठी कीकरण समिती मनसे आणि इतर राजकीय पक्ष आणि संघटनांकडून करण्यात आली आहे. जर एवढा विरोध करून सुद्धा मराठी महापौर बसवला जाणार नसेल आणि डिंपल मेहताच महापौर बसतील तर आमचा आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे म्हटले आहे. हे पण वाचा : Mahatma gandhi statue : ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींच्या पुतळ्याची चोरी; यापूर्वीही झाला होता विटंबनेचा प्रयत्न, वाचा…