Kaumudi Walokar : ‘आई कुठे काय करते’ फेम कौमुदी वलोकरचा पार पडला संगीत सोहळा

‘आई कुठे काय करते’ फेम कौमुदी वलोकरचा नुकताच संगीत सोहळा पार पडला आहे. अभिनेत्रीच्या संगीत सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. कौमुदीने तिच्या संगीत सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिने या संगीत सोहळ्याला गोल्डन रंगाचा भरजरी असा सुंदर लेहेंगा घातला होता. तर, तिचा पती आकाश चौकसेने भरजरी वर्क असणारी शेरवानी घातली होती. सध्या कौमुदी आणि आकाशच्या संगीत सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्यावर अनेक जणांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
कौमुदीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच आकाश चौकसेने या संगीत सोहळ्यात फिल्मी स्टाइल प्रपोज केलं. याचा व्हिडीओ अभिनेत्री कृतिका देवने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आकाश कौमुदीला म्हणतो, “कौमुदी… या अखंड ताऱ्यांच्या साक्षीने आणि उद्या सकाळच्या सूर्य किरणांच्या साक्षीने… माझ्याशी लग्न करशील?” अर्थात, कौमुदीने ‘हो’ उत्तर दिल्यावर आकाशचा आनंद गगनात मावेनासा होतो.





